लॅबमध्ये तयार झाले मटण, आता प्राण्यांना मारण्याची गरज नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मटण खायचं असलं की प्राण्यांना मारावं लागतं. मात्र आता प्रयोगशाळेत असं मटण तयार होतंय, ज्याच्यासाठी प्राण्यांना मारावं लागणार नाही. सिंगापूर फूड एजेन्सीने प्राण्यांच्या पेशीपासून तयार होणाऱ्य़ा मटणाला सुरक्षिततेचे म्हणजेच खाण्यायोग्य प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच प्रयोगशाळेत तयार केलेले मटण मार्केटमध्ये येईल.

‘ईट जस्ट’ या अमेरिकेच्या स्टार्टअप कंपनीने प्रयोगशाळेमध्ये प्राण्यांच्या पेशीपासून मटण तयार केले आहे. ईट जस्टचे सीईओ जोश ट्रटिक यांनी सांगितले की लवकरच सिंगापूरच्या रेस्टॉरंटमध्ये आमच्या मटणापासून तयार केलेले पदार्थ मिळतील. जगभरात इकोप्रेंडली गोष्टींची निर्मिती केली जात आहे. त्याच धर्तीवर फूड इंडस्ट्रीदेखील विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

मांसाहारींना सुरक्षित पर्याय

प्राण्यांना मारल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. मटण खाण्याचे प्रमाण जगभरात वाढते आहे. 2050 पर्यंत मटणाची मागणी 70 टक्क्यांपर्यंत वाढेल. ग्राहकांची वाढती मागणी बघता मटणाला दुसरा पर्याय शोधणे गरजेचे आहे. प्रयोगशाळेत तयार केलेले मटण हा ग्राहकांसाठी सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.