
>> अरुण जोशी
मागील दोन वर्ष सर्वच सण-उत्सवांना ‘कोविड’ने ग्रासलं होतं. या वर्षी मात्र पुन्हा नव्या जोमाने, जल्लोषाने सर्वकाही साजरं होतंय. दिवस गणेशोत्सवाचे आहेत. त्यावेळी ‘नाद-मराठी’मध्ये लिहिताना अगदी साहजिक मनात आलेलं गाणं म्हणजे ‘सूर निरागस हो… गणपती.’ प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या स्वरातलं हे गाणं गेली काही वर्षं सातत्याने गाजतंय – वाजतंय. गणपतीच्या काळात तर अधिकच. मंगेश कांगणे यांचे शब्द आणि शंकर-अहसान-लॉय यांचं संगीत असलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या सुबोध भावे दिग्दर्शित अप्रतिम चित्रपटातलं हे कमालीचं रसिकप्रिय झालेलं गीत. त्यांच्या साथीला आहेत आनंदी जोशी.
आपल्या या लेखमालेतील अमराठी गायक – गायिकांनी गायिलेल्या मराठी गाण्यांची उजळणी आपण करत आहोत. परंतु शंकर जन्माने तामीळभाषी असला तरी त्याचं बालपण गेलं मुंबईतल्या चेंबूर येथे. त्याचे मित्र मराठी, पत्नी मराठी. तो उत्तम मराठी बोलतो आणि श्रीनिवास खळे यांच्यासारख्या दिग्गज संगीतकाराकडे वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी वीणावादन करून काwतुकाची पावती मिळवतो. म्हणजे खरं तर तो मराठी संस्कृतीशी समरस झालेला अस्सल मऱहाटीच! केवळ तो महादेवन असल्याने त्याचा या लेखमालेत समावेश इतपंच.
शंकरचं गाणं पिंवा सूर जितके निरागस तसाच त्याचा स्वभावही. खळेकाकांकडे ‘राम-श्याम गुणगान’मध्ये वीणा वाजवणारा शंकर ललिता वेंकटरामन यांच्याकडे हे वाद्य शिकला. त्यानंतरचा त्याचा प्रवास खरोखरच ‘कटय़ार’मधल्या ‘पंडितजी’ या पदवीला साजेसा झाला आहे. शंकर-अहसान-लॉय या त्रिमूर्तीने संगीत दिलेल्या चित्रपटांची यादीही खूप मोठी आहे. रॉकपर्ह्ड, भोपाल एक्प्रेस, शूल, बंटी और बबली (कजरा रे), कुछ ना कहो, अरमान असे त्यांचे कितीतरी चिपत्रट आणि मराठीतला मानाचा तुरा म्हणावा असा ‘कटय़ार…’
शंकर महादेवन यांचं उच्च शिक्षण झालं ते कॉम्प्युटर क्षेत्रात. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची त्यांची जाण तितकीच प्रगल्भ आहे. अनेक मान-सन्मान मिळालेल्या शंकर यांना 2019 मध्ये ‘पद्मश्री’ गौरवही प्राप्त झाला. काही तमीळ सिनेमांत पाहुणा कलाकार म्हणून काम केलेल्या शंकर यांनी ‘कटय़ार’मधल्या पंडितजींच्या भूमिकेला न्याय देत सुबोध भावेंची निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं. ‘अगंबाई अरेच्चा!’ चित्रपटातलं गुरू ठाकूर यांनी लिहिलेलं आणि अजय-अतुल यांचं संगीत असलेलं ‘मन उधाण वाऱयाचे गुज पावसाचे’ हे गाणं तरुणाई आजही गुणगुणते. ‘बंध प्रेमाचे’मध्ये त्यांनी प्रीती कामत- तेलंगसह अजय – अतुल यांच्याच संगीत दिग्दर्शनात, प्रवीण दवणे यांचं ‘चिंब भिजलेले रूप सजलेले’ हे गाणं गायलं. ‘ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्यासमवेत ‘सरीवर सरी’ या चित्रपटासाठी शंकर महादेवन यांनी गायिलेलं गाणं आहे ‘पंठ आणि आभाळ दाटून येती’ आणि संगीत भास्कर चंदावरकर यांचं. पं. संजीव अभ्यंकर यांच्यासह त्यांनी केदार पंडित यांच्या संगीतातलं वैभव जोशी यांचं ‘हे मन कधी पाखरू’ हे भावगीत गायिलंय आणि बालगंधर्व चित्रपटातलं त्यांचं ‘परवरदिगार’ हे काwशल इनामदार यांनी संगीत दिलेलं गीतही खूप गाजलं. त्यांच्या आरंभीच्या ‘कोई जो मिला तो मुझे’च्या निर्मितीची कथाही मनोरंजक. शंकर यांनी जावेद अख्तर यांना एक ‘धून’ ऐकवली आणि जावेद यांनी त्यावर चपखल शब्द लिहिले आणि जावेद यांच्या घरापासून स्वतःच्या घरापर्यंतच्या प्रवासात शंकर महादेवन यांचं अद्वितीय ‘ब्रेथलेस’ गाणं तयारही झालं. अशीच दाद त्यांना गीतकार गुलजार यांच्याकडूनही एकदा मिळाली. ‘कजरा रे तेरे काले काले नयना’ हे शब्द शंकर यांना सुचले. त्यांनी ते गुलजारना ऐकवले आणि त्यांनीही फक्त ‘काले काले’ऐवजी ‘कारे कारे’ करूया, असं म्हणून ते कायम ठेवले. हे या गीतकाराचं मोठेपण.
आमीर खान यांनी ‘तारे जमीं’पर हा एक भावस्पर्शी चित्रपट दिला. त्यातलं तितपंच व्याकूळ करणारं ‘मै कभी बतलाता नाही, तुझे सब पता है ना माँ’ हे गाणं शंकर महादेवन यांनीच स्वरमंडित केलंय. तर अशा या मराठी संस्कृतीत सजलेल्या आणि जगभरात गायक – संगीतकार म्हणून विख्यात झालेल्या कलाकाराची यशस्वी कहाणी. शंकर महादेवन यांनी स्वर दिलेल्या गाण्यानेच या लेखाची सांगता करूया.
‘सूर निरागस हो… गणपती
शुभनयना करुणामय
गौरीहर श्री वरदविनायक
ओंकार गणपती, अधिपती, सुखपती
छंदपती, गंधपती… लीन निरंतर हो…
शंकर महादेवन यांचे स्वरही अधिकाधिक निरंतर निनादत राहू देत!

























































