अरविंद केजरीवाल यांचा आज शपथविधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर उद्या रविवारी अरविंद केजरीवाल तिसऱयांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा सकाळी दहा वाजता रामलीला मैदानावर पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून सुरक्षेसाठी तीन हजार पोलीस तैनात केले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम या सहा जणांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. दरम्यान केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोहळ्यासाठी आमंत्रण दिले आहे.

त्याचबरोबर दिल्लीतील सर्व खासदार आणि भाजपच्या नवनिर्वाचित आठही आमदारांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मुख्य लढत आम आदमी पार्टी आणि भाजपमध्येच होती. त्यानुसार भाजपने 55 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र आपने 62 जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला आहे.