‘गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भामटय़ांना धडा शिकवा…’ ; अरविंद सावंत यांचे भाजपवर टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गल्लीपासून दिल्लीपर्यंत भामटे भरले आहेत, असे टीकास्त्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सोडतानाच, या भामटय़ांना 2024 च्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवा, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी आज राज्यातील लोकांना केले.

भामटा राजपूत जातीचे बोगस प्रमाणपत्र घेऊन भटक्या विमुक्त प्रवर्गात झालेली घुसखोरी रोखण्यासाठी एसआयटी चौकशी करावी या मागणीसाठी बंजारा समाजातील चार तरुण वाशीमच्या पोहरादेवी येथे आंदोलनाला बसले आहेत. खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या तरुणांची आज भेट घेतली. त्यांच्या मध्यस्थीनंतर या तरुणांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सावंत यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.