आसाम, ओडिशा चीनच्या रडारवर,तेजपूर हवाईतळ आणि डॉ. कलाम बेटावरील क्षेपणास्त्र केंद्र टार्गेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाख सीमेवर कुरापती सुरूच ठेवणाऱ्या चीनने आता हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आसाम आणि ओडिशा हे लाल माकडांच्या रडारवर आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले तेजपूर हवाईतळ आणि डॉ. अब्दुल कलाम बेटावरील क्षेपणास्त्र प्रशिक्षण केंद्र चीनच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती आहे. या दोन महत्त्वाच्या ठिकाणावरून  सुमारे 8201 फुट उंचीवरून जाणारी कोणतीही वस्तू चीनी रडावरच्या नजरेतून सुटत नाही.

या संदर्भात इंडिया टुडेने सॅटलाईटवरून मिळालेला फोटोवरून ही माहिती दिली आहे. हवाईदलाचे आसाममध्ये तेजपूर येथे महत्त्वाचा एअरबेस आहे. या एअरबेसचा वापर लष्करी आणि नागरी कामांसाठी होतो. हवाई दलाने येथे सुखोई फायटर विमाने तैनात केले आहेत. हिंदुस्थानच्या या हवाईतळावर चीनी सैन्यांकडून म्यानमार सीमेजवळ असलेल्या युनान प्रांतातून लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी चीनने युनान प्रांतात रडार बसविले आहे.

आसाममधील व्हीलर द्वीप हे बेट अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव या बेटाला दिले आहे. येथे अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या अग्नी 4 आणि इतर क्षेपणास्त्रांची चाचणी होते.

8205 फुटावरील वस्तू चीनच्या टप्प्यात

2017 मध्ये डोकलाम येथे हिंदुस्थान-चीनचे सैन्य 73 दिवस आमने-सामने होते. डोकलाम संघर्षानंतर चीनने मार्च 2018 मध्ये म्यानमार सीमेपासून तीन किलोमीटरवर हे स्टेशन उभारले आहे.

तेजपूर एअरबेस आणि डॉ. अब्दुल कलाम बेटावरून 8205 फुटावरून जाणारे कोणतेही विमान इतर वस्तूंवर नजर ठेवण्याची क्षमता चीनच्या रडारवरकडे आहे.