
एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा केला आहे. भाजप खासदार डी. अरविंद यांनी ओवेसी यांना भर मैदानात उलटं लटकवून त्यांची दाढी कापण्याची धमकी दिल्यानंतर आता ओवेसींनी त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
‘आरएसएस माझ्या हत्येचा कट रचत आहे. पण मी कुणाला घाबरत नाही. मी शहीद व्हायला तयार आहे. शहरात एकटा फिरत असतो. या मला गोळ्या घाला. तारिख ठरवतो तुम्ही या आणि मला मारून टाका’, असे ओवेसी यांनी सांगितले आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.
शनिवारी तेलंगणातील धरमपूरी येथील भाजप खासदार डी. अरविंद यांनी ओवेसी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी ओवेसींनी क्रेनला उलटा लटकवून त्यांची दाढी कापेन व नंतर तिच दाढी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या चेहऱ्याला चिकटवेन असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

























































