
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील 170 गावांमध्ये 199 आशा वर्कर व 256 अंगणवाडी कार्यकर्त्या विविध सर्वे व समुपदेशन करण्याचे काम करीत असून तालुक्यातील 45075 घरांचा सर्व्हे करून बाहेर जिल्ह्यातील 8122 लोकांची नोंद केली आहे. अगदी तुटपुंज्या पगारावर करीत असलेले त्यांची सेवा निश्चित सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे.
तालुक्यात 170 गावे असून तालुक्यामध्ये 199 आशा वर्कर आहेत. शिवाय जवळपास 256 अंगणवाडी कार्यकर्ते असून 308 अंगणवाडी मदतनीस आहे. अगदी शासनाच्या तुटपुंज्या मानधनावर या महिला ग्रामीण भागात कर्तव्य बजावत आहेत. त्यातच कोरोना सारख्या महामारीमुळे यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. तालुक्यातील 170 गावात आशा वर्कर या अत्यंत जबाबदारीने काम सांभाळत आहेत. प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तींचा सर्वे त्या करीत आहेत. घरातील व्यक्तींना कोरोनाचे लक्षण आहेत का? ताप, सर्दी, घशाचा त्रास ही लक्षणे आहेत का? याचा सर्वे करीत असतानाच इतर जिल्ह्यातून आपल्याकडे कोणी आले आहे का? आले असेल तर त्याची तपासणी केली आहे का? तातडीने संबंधित व्यक्तीला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन किंवा ग्रामीण रुग्णालयात नेऊन संबंधिताची तपासणी करणे,
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीला घरातच राहण्याचा सल्ला देणे या संदर्भातली कामे आशा वर्करच्या मदतीने होत आहेत. आशा वर्कर करीत असलेले काम अत्यंत प्रेरणादायी असून इतक्या कमी मानधन मध्ये या महिला काम करीत असल्याने खऱ्या अर्थाने त्या राष्ट्र सेवा करीत आहेत.
























































