
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावात यंदा प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त गावरहाटीतील गावकऱयांच्या सहकार्याने श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे. सकाळी 6 वाजता श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीवर दुग्धाभिषेकाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दिंडी सोहळा, भजन, कीर्तन, फराळ वाटप, गावातील स्थानिक भजने आणि शेजआरती करून या उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी या सोहळय़ात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन नाधवडे-आषाढी एकादशी उत्सव समितीने केले आहे.




























































