प्रामाणिकपणाची किंमतचुकवावी लागते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Finance Minister Arun Jaitley along with Ashok Lavasa during the press conference at Media Center on Tuesday. Express Photo by Renuka Puri. 24.10.2017.

जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी प्रामाणिकपणाची एक किंमत असते. प्रामाणिक लोकांना त्याची किंमत थेट किंवा नुकसानीच्या स्वरूपात चुकवावी लागते. त्यामुळे ज्यांचा प्रामाणिकपणे आणि नम्रपणे विरोध करण्यात आला आहे त्या लोकांकडून कोणत्याही स्वरूपाची अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे असल्याचे सांगत निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंग प्रकरणात क्लीन चिट देण्यास लवासा यांनी विरोध केला होता. त्यामुळे परत केंद्रात सत्ता आल्यावर लवासा यांची पत्नी, मुलगा आणि बहीण यांच्या मागे प्राप्तिकर खात्यामार्फत चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला होता.

लवासा यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात मोदी आणि शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ते लिहितात, ‘एखाद्या लोकसेवकाने सार्वजनिक हिताशी तडजोडशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला बेईमानी ठरवले जाऊ शकत नाही. अशा प्रकारच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या हस्तक्षेपालाही आपल्या बाजूने मानले जाऊ शकत नाही. करिष्ठ स्तरावर विवेकाचा वापर गरजेचा असतो. कधी कधी नियमांद्वारे लोकांना भडकावणे अशक्य होऊन जाते,’.