मराठमोळ्या तुषार, आकाशची पॉवर; एशियन बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

तुषार गायकवाड व आकाश अवटे या पुण्यातील मराठमोळ्या खेळाडूंनी मेन्स ऍथलेटिक फिजिक्स स्पोर्टस् स्पर्धेतील आपापल्या गटात रौप्य पदकाची कमाई करून 52 व्या एशियन बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्टस् चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारचा दिवस गाजविला. तुषारला यापूर्वीच्या चार स्पर्धांमध्ये रिकाम्या हातांनी परतावे लागले होते. आकाश अवटेने मात्र प्रथमच या स्पर्धेत सहभागी होऊन थेट पदकाला गवसणी घातली.

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत तुषार गायकवाडने 167 सेंटिमीटर गटात रौप्य पदकाची कमाई केली. आकाश अवटेने प्रथमच या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होताना मेन्सफिजिक फिटनेस  (170सेंटिमीटरपेक्षा अधिक) श्रेणीत रौप्य पदक पटकावले.

आकाश अवटे हा एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून तो कमर्शियल आर्टिस्ट आहे. तो म्हणाला, ‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी व्हायचे हे माझे स्वप्न होते. यंदा ही स्पर्धा पुण्यात भरवण्यात आली आणि नशिबाने मला तिच्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. सुदैवाने माझे कुटुंबीय आणि मित्र यांच्या माझ्यावरील विश्वासाचे मी चीज करू शकलो.’

मेन्स ऍथलेटिक फिजिक (175सेंटिमीटर गटात) या श्रेणीतदेखील हिंदुस्थानच्या अनिलकुमार यादवने दुसरा क्रमांक पटकावला.

मेन्स फिटनेस फिजिक (170सेंटिमीटरपेक्षा कमी)

वांचाई काजनपिमीने (थायलंड) – सुवर्ण, वस्सापॉल मसाकोल  (थायलंड) – रौप्य, हमीद उल्ला खोशदिल (अफगाणिस्तान) – कास्य.

मेन्स फिटनेस फिजिक (170सेंटिमीटरपेक्षा अधिक)

 दमराँग सॉयसी (थायलंड) – सुवर्ण, आकाश अवटे (हिंदुस्थान) -रौप्य, मार्कोआफ्रेडली (मकाऊ, चीन) – कास्य.

मेन्स ऍथलेटिक फिजिक (160सेंटिमीटरपेक्षा कमी )

झांग क्षिआयन (चीन) – सुवर्ण, न्गुयेन थांहलाँग (व्हिएतनाम) – सुवर्ण, महमूदझियाद (मालदीव) – कास्य.

मेन्स ऍथलेटिक फिजिक (167 सेंटिमीटर गट)

महंमद सायरूल आझमानमहेन (मलेशिया) – सुवर्ण, तुषार गायकवाड (हिंदुस्थान) – रौप्य, ट्रान हय़ुडय़ू (व्हिएतनाम) – कास्य.

मेन्स ऍथलेटिक फिजिक (175सेंटिमीटर गट)

यासरबोर जाईलझादेक (इराण) – सुवर्ण, अनिलकुमार यादव (हिंदुस्थान) रौप्य, ट्रान क्हानटॅम (व्हिएतनाम) – कास्य.

मेन्स ऍथलेटिक फिजिक (182 सेंटिमीटर गट)

घसेम शेनाका (इराण) – सुवर्ण, इव्हान अफनास्येक्ह (कझाकीस्तान) – रौप्य, अब्दुल हलिम अहमदी (अफगाणिस्तान) – कास्य.