
वेस्ट इंडीजचा महाकाय अष्टपैलू क्रिकेटपटू 29 वर्षीय रहकीम कॉर्नवॉलने अटलांटा ओपन टी-20 क्रिकेट लीगमध्ये अटलांटा फायरसाठी 43 चेंडूंत 17 चौकार आणि 22 षटकारांच्या मदतीने 205 धावांची विक्रमी द्विशतकी खेळी केली आहे. याचा रहकीमने तीन वर्षांपूर्वी टीम इंडियाविरुद्ध वेस्ट इंडीजकडून पदार्पण केले होते आणि त्याच्या लठ्ठपणामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. तेव्हा त्याचे वजन 140 किलो होते. अटलांटा फायरने 6.6 फूट लांब फलंदाज असलेल्या रहकीमच्या खेळीमुळे स्क्वेअर ड्राइव्ह संघावर 172 धावांनी विजय नोंदवला. अटलांटा फायरने विजयासाठी समोर ठेवलेल्या 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्क्वेअर ड्राइव्हचे फलंदाज निर्धारित 20 षटकांत 8 विकेट गमावून 154 धावाच करू शकले. यशवंत बालाजीने 38आणि वरुण साई मंथाने 36 धावा केल्या.



























































