अॅक्सिसचे एटीएम फोडून 8 लाख लंपास; आंध्रा बँक लुटण्याचा प्रयत्न

31

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहर आणि उपनगर भागात दिवसेंदिवस चोऱ्या, घरफोडीच्या घटना वाढत असतानाच आता बँकांचे एटीएमही लक्ष्य केले जात आहेत. केडगाव येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडून 8 लाख 38 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. तर गुलमोहर रोडवरील आंध्रा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केडगाव येथे जलाराम बेकरी जवळ महामार्गावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. 12 मे रोजी मध्यरात्री 1.45 ते सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 8 लाख 38 हजार रुपये लंपास केले आहेत. शेखर विजय भोसले यांनी याबाबत तक्रार दिली आहे. दरम्यान, 8 लाखांची रोकड चोरी होऊनही तब्बल दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच 14 मे रोजी पहाटेच्या सुमारास गुलमोहर रोडवरील आंध्रा बँकेचे एटीएम वेल्डींग कटरने फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याबाबत असिस्टंट मॅनेजरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या