एटीएसची मोठी कारवाई; मुंब्रातून चार तर संभाजीनगरातून पाच जण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई करत नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. एटीएसने मुंब्रातील कौसा, अमृतनगर येथून चौघांना तर संभाजीनगरातून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. इसीसशी संबंध असल्याच्या संशयावरून या नऊ जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

मंगळवारी एटीएसने नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले अनेक दिवसांपासून रडारवर होते. मुंबईत अथवा महाराष्ट्रात घातपात होण्याची शक्यता एटीएसला मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेले नऊही जण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असून राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेला (एनआयए) मिळालेल्या माहितीनुसार ही संलग्न कारवाई करण्यात आली आहे. मुंब्र्यातून ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट देखील केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.