पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी 7.45 वाजता चिंचवडच्या गावडे कॉलनीत घडली. सुरज सुनील शेळके (वय 23, रा. वेताळनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सोन्या उर्फ आशुतोष वराडे (रा. भोई आळी, चिंचवड), प्रथमेश हिरेमठ आणि एक अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी यांच्यात दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडणे झाली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातूनच आरोपींनी सोमवारी सकाळी सुरज शेळके यांच्यावर पाठीवर कोयत्याने वार केले. त्यात शेळके जखमी झाले आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.