बहिणीला त्रास देऊ नको, असे सांगणाऱ्या भावावर वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहिणीला प्रपोज करणा-याला समजावून सांगितल्याचा राग आल्याने तरुणाने एकावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी अस्लम शेख (रा. येवलेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अस्लमने फिर्यादीच्या बहिणीला सात ते आठ महिन्यांपूर्वी रस्त्यात अडवून ‘प्रपोज’केले होते. त्यावेळी तरुणीच्या भावाने आरोपीला भेटू बहिणीला त्रास देऊ नको, असे समजावून सांगितले होते, मात्र त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यामुळे आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.