बीड मध्ये युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला

3394

बीड येथील युवा सेनेचे विधान सभा अधिकारी राहुल फरताळे यांच्यावर दोघा तरुणांनी भरवस्तीत तलवारीने जीव घेणा हल्ला झाला आहे. यात ते गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

बीड येथील युवा सेनेचे विधानसभा अधिकारी राहुल फरताळे यांच्यावर आज दुपारी एक वाजता सारडा सर्कल समोरील भर वस्ती मध्ये समोरून आलेल्या दोन तरुणांनी डोळ्यात चटणी टाकून त्यांच्यावर तलवारीने जीव घेणा हल्ला केला आहे. डोक्यात अन बरगडीवर तलवारीचे वार झाल्याने ते गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने जिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, युवा जिल्हाधिकारी सागर बहिर सह शिवसैनिकानी  रुग्णालयात धाव घेतली आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मारेकर्‍यांनी ओळख अद्याप पटलेली नाही तसेच त्याचे कारणही अजून झाले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या