दाऊदच्या मुंबकेतील जागांचा लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मूळगाव असलेल्या खेडमधील मुंबके या गावातील चार जागांचा लिलाव 5 जानेवारी 2024 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दाऊदच्या जागांचा लिलाव करीत सरकारने दाऊदला मोठा धक्का दिला आहे.

चार शेतजमिनीचा होणारा लिलाव जवळपास 20 गुंठयाहून अधिक जागेचे क्षेत्र असून चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत नऊ लाख 41 हजार 280 रुपये इतके आहे, तर दुस्रया शेतजमिनीची किंमत अंदाजे आठ लाख 8 हजार 770 रुपये इतकी आहे. मुंबके परिसरातील दाऊद इब्राहिम यांच्या या चार जागा सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत 21 नोव्हेंबर 2023 ला लिलावाबाबत नोटीसही काढली होती. दाऊद इब्राहिम याचे मूळ गाव खेड तालुक्यातील मुंबके हे असून आता साफेमा अर्थातच स्मगलिंग अॅण्ड फॉरेन एक्सचेंज मॅन्युफ्यूलेटर्सच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमच्या जागा आता सरकार ताब्यात घेत आहे.