
श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव रविवार, 9 ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमेनिमित्त सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजता मंदिर परिसरात करण्यात येणार आहे. सोन्याच्या अलंकारामध्ये श्रीगणेश प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठय़ा, सोन्याच्या साखळय़ा, हार यांचा समावेश आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.




























































