चॉकलेट खाल्ले म्हणून चिमुरडीला काकीने दिले चटके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

दहा रुपयाचे चॉकलेट खाल्याने काकीने सहा वर्षांच्या पुतणीला गरम चमच्याने चटके दिल्याची संतापजनक घटना मालवणी परिसरात घडली. मुलीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घडल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

पीडित मुलगी ही मालवणी परिसरात तिच्या काकीकडे राहते. गेल्या आठवडय़ात काकीने मुलीला मटण आणण्यासाठी 50 रुपये दिले होते. मुलीने 40 रुपयाचे मटण विकत घेऊन उर्वरित 10 रुपयांचे चॉकलेट खाले. चॉकलेट खाल्याने संतापलेल्या काकीने मुलीचे हातपाय बांधून तिला गरम चमच्याने चटके दिले.

हा प्रकार शेजारी राहणाऱया मुलीच्या दुसऱया काकीला समजला. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेक्हा हा प्रकार समोर आला. मुलीच्या काकीने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मुलीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले. घडल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी मुलीच्या काकीविरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली.