संभाजीनगर जिल्ह्यात 3353 रुग्णांवर उपचार सुरू, 4162 रुग्ण कोरोनामुक्त; आज 183 रुग्णांची वाढ

629

संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी १६० आणि दुपारी २३ असे १८३ जण नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्याबरोबर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७८५५ झाली असून, त्यापैकी ४१६२ बरे झाले, ३४० जणांचा मृत्यू झाला. तर ३३५३ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मनपा हद्दीत १४१ रुग्ण
महानगरपालिका हद्दीत आज १४१ बाधित आढळून आले असून, यात हर्सुल (१), आंबेडकर नगर (१), घाटी परिसर (२), विवेकानंद हॉस्पीटल परिसर (१), ज्युबली पार्क, भडकल गेट (१), मयूरपार्क, हडको (४), गणेशनगर (१), जय विश्वभारती कॉलनी (२), कोकणवाडी (२), शिवाजीनगर (५), बीड बायपास (१), रमानगर (८), भारतनगर (१),  सातारा परिसर (९), उत्तमनगर (६), शिवशंकर कॉलनी (९),  गजानननगर (२), मातोश्रीनगर (३), मयूर पार्क (११), पद्मपुरा (१), छावणी (१), ज्योतीनगर (२), चिकलठाणा (२), बंजारा कॉलनी (१), ठाकरेनगर (१),  एन दोन सिडको (१),  एन सहा सिडको (४), एन बारा सिडको (१), विठ्ठलनगर (२), संजयनगर, मुकुंदवाडी (१), सुरेवाडी (१),  म्हाडा कॉलनी (१), कैलास नगर (३), जयभवानीनगर (१), विजयनगर (१), विष्णूनगर, आकाशवाणी परिसर (१२), जरीपुरा (१), मोंढा नाका (१), टीव्ही सेंटर (१),  नागेश्वरवाडी (६), फिरदोस गार्डन् परिसर (३), शिवाजीनगर, गारखेडा (४), पुंडलिकनगर (१), लक्ष्मी कॉलनी (१), आंबेडकरनगर (२), भावसिंगपुरा (२), शिव रेसिडन्सी, उल्कानगरी (१), आदर्श कॉलनी, गारखेडा (१), पीरबाजार, गुरुगोविंदसिंगपुरा (१), नवजीवन कॉलनी (२), कासलीवाल परिसर (१), एन अकरा (१), नंदनवन कॉलनी (१), सिडको (१), अन्य (४) यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात ४२ रुग्ण
ग्रामीण भागात आज ४२ बाधित आढळून आले असून यात विश्वविजय सो., बजाजनगर (१), पियूषविहार बजाजनगर (१), भगतसिंगनगर, बजाजनगर (४), गुरूदेव सो., मुंडे चौक, बजाजनगर (१), गुरूकृपा सो.,  मुंडे चौक, बजाजनगर (१), द्वारकानगरी, बजाजनगर (१), रांजणगाव शेणपुजी, बजाजनगर (१), बजाजनगर (२), छत्रपतीनगर, बजाजनगर (२), रांजणगाव, बजाजनगर (१), जिजामाता सो., बजाजनगर (१), वंजारवाडी (१), कल्पतरू सो., पतीयाला बँकेजवळ (१),  गजानननगर (१), स्वर्णपुष्प सो., बजाजनगर (१), संत कॉलनी, वाळूज (१), शिवालय चौक, बजाजनगर  (१), गणेश सो., बजाजनगर (१), हतनूर, कन्नड (७), मनिषानगर, वाळूज (१), मातोश्रीनगर, रांजणगाव (२), जामा मस्जिद जवळ, वाळूज (१), ओम साईनगर, कमलापूर (२), जवखेडा खु. ता. कन्नड (१),  उंबरखेडा, कन्नड (१), जदगाव, करमाड (१), वाळूज (१), वंजारवाडी (१), नेहाविहार, तिसगाव, बजाजनगर (१) रुग्ण आढळून आला.

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीमध्ये नऊ रोजी शहरातील गुरुगोविंदसिंगपुरा भागातील ७५, जालन्यातील ६५ आणि शहरातील खासगी रुग्णालयात सिडको एन नऊमधील यशवंत सोसायटीतील ७४ वर्षीय कोरोनाबाधित स्त्री रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या