संभाजीनगरातील कोरोनाबाधितांचा आकडा 51 वर; समतानगर, आसेफिया कॉलनीतील दोघे पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. शनिवारी एकाच दिवशी 5 जण पॉझिटिव्ह अधल्यानंत आज रविवारी सकाळी समतानगरमधील 60 वर्षीय आणि आसेफिया कॉलनीतील 35 वर्षीय अशा 2 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यामुळे कोरोनाचंबधितांची संख्या 51 वर पोहोचल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाँ. निता पाडळकर यांनी दिली.

संभाजीनगर शहरात आजवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती बाधित निघत आहेत. समतानगर मधील बाधितांच्या संपर्कातीळ क्वारंटाइन केलेली एक जण पॉझिटिव्ह निघाली. तसेच आसेफिया काँलनीतील जेष्ठ नागरिकाच्या संपर्कातील महिला कोरोनाबाधित आढळून आली. त्यामुळे बाधितांची संख्या 51 वर गेली आहे.

शहरात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
सरकार आणि पोलिस यंत्रणा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. मात्र शहरातील विविध वसाहतींमध्ये विशेषता मुस्लिम मोहल्ल्यामध्ये सरकारने ठरवून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा मज्जा उडताना दिसत आहे. या मोहल्ल्यांमध्ये प्रचंड संख्येने मुले महिला पुरुष रस्त्यावर येऊन गर्दी करत आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हे सोशल डिस्टसिंग जोपर्यंत खऱ्या अर्थाने पाळले जाणार नाही तोपर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच राहणार आहे. पाहता पाहता नियंत्रणात आलेली कोरोना बाधितांची संख्या पन्नाशी पार करून गेली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा आणि आणि प्रशासन धास्तावले आहे. आज शहरातील चेलीपुरा भागात दुपारच्या सुमारास फळे आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची प्रचंड झुंबड उडाली होती. वास्तविक स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी फळे विकण्याची वेळ ठरवून दिलेली असताना चेलीपुरा भागात आज मोठ्या संख्येने विक्रेते आणि फळे खरेदी करण्याची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. ही प्रशासन आणि पोलीस यंत्रणेपुढे मोठी आव्हानात्मक स्थिती आहे, जी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

सोशल डिस्टनसिंगचा फज्जा असाच उडत राहिल्यास मे आणि जुनच काय तर सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत देखील कोरोना विषाणूंचा फैलाव आटोक्यात आणणे शक्य होणार नाही. त्यासाठी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने शहरातील संचारबंदी कठोर करणे गरजेचे आहे. किमान दहा दिवस भाजीपाला व फळे खाल्ली नाही तरी जगता येऊ शकते. मात्र जर कोरोना बाधितांची संख्या वाढल्यास ही मराठवाड्याची ऐतिहासिक राजधानी कोरोना बाधितांचे माहेरघर होईल यात शंका नाही.

कोरोना बाधितांच्या मृत्यूचा दर दहा टक्के
शहरात आज एकूण कोरोना बाधितांची संख्या 51 वर पोहोचली आहे. त्यामानाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 5 वर पोहोचल्याने ती साधारणत 9.80 टक्के आहे. तर शहरातील कोरोनामुक्ताची टक्केवारी ही 43.14 वर धडकली आहे. तर जिल्हा रुग्णालयात 20 आणि घाटी रुग्णालयात आज 4 असे 24 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. प्रदिप कुलकर्णी यांनी दिली.