
शहरात आज सकाळी 9 आणि सायंकाळी 4 वाजता नवीन 6 असे 15 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता शहरातील बाधितांची संख्या 297 वर पोहोचल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी दिली.
सकाळी नव्याने आढळलेल्या 9 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये किलेअर्क भागातील 1, चिकलठाणा येथील सावित्री नगरातील 1, पुंडलीकनगर भागातील 2, जयभीमनगर घाटी भागातील 3 आणि नंदनवन कॉलनीतील 1 जण यांचा समावेश आहे. तर सायंकाळी 4 वाजता आढळून आलेल्या 6 बाधितांमध्ये संजयनगर मुकुंदवाडी भागातील 26 आणि 27 वर्षीय पुरुष, एक 20 वर्षीय महिला आणि अन्य एक असे 4, किलेअर्क येथील 65 वर्षीय पुरुष, आणि सिडको एन-11 टीव्ही सेंटर येथील एका 27 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा! मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा देवळाई येथील 55 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याने शहरातील कोरोनाच्या बळींची संख्या 10 वर पोहोचली आहे

























































