
विजय जोशी । नांदेड
पाण्यासाठी तहानलेल्या मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली असली तरी नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याचसोबत नदी काठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा 80 टक्क्यांहून अधिक झाल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्तांकडून पत्राद्वारे कळवण्यात आल्याचे नांदेडचे नांदेड जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी ‘दै. सामना’सोबत बोलताना सांगितले.
सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठी 80 टक्के पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत धरणाचे दरवाजे आवश्यकतेनुसार उघडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरीच्या मुख्यपात्रातील पाण्याच्या पातळी वाढ होऊन पूर सदृश परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.




























































