वंचित आघाडीच्या शांतता रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र दिनानिमित्त शांतता फेरी काढण्याचे आयोजिले होते. मात्र त्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

वंचित आघाडीने 1 मे रोजी क्रांतीचौक, पैठणगेट, महात्मा ज्योतिबा फुले, औरंगपुरा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेटपर्यंत शांतात फेरी काढणार होते. त्यासाठी पोलिसांची परवानगी मागण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्यांना ही शांतता फेरी सकाळी सात ते 9 या वेळेत आयोजित करण्याबाबत पत्र पाठवले होते. मात्र त्या पत्राला वंचित आघाडीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी त्यांची मूळ मागणी फेटाळल्याचे त्यांना कळविले,