कोरोनापाठोपाठ सारीची साथ, एक बालक दगावला; सहा रुग्ण आढळले

1726

कोरोना पाठोपाठ आलेल्या सारीच्या आजाराने संभाजीनगरमध्ये एक बालक दगावला असून सहा रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांच्या रक्ताचे व लाळेचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डाँ. निता पाडळकर यांनी सांगितले.

शहरात कोरोना व्हायरसची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. कोरोना पाठोपाठ आता सारीच्या आजाराने मंगळवारी एका बालकाचे निधन झाल्याने एकच खळबळ उडाली. मनपा आरोग्य विभागाने तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात सारीच्या आजाराने दाखल असलेल्या रुग्णांची माहिती मागवली. त्यामध्ये चार रुग्ण सारीचे असल्याचे आढळून आले. आज बुधवारी आणखी दोन रुग्ण सापडले. या सात रुग्णाच्या रक्ताचे व लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले असल्याचे डाँ. पाडळकर यांनी सांगितले.

पंधरा जणांचे स्वॉब घेतले
जिल्हा रुग्णायलात तपासणीसाठी गेलेल्या १५ जणांचे स्वॉब तपासणीसाठी एनआयव्हीच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या