
सामना प्रतिनिधी, औसा
औसा तालुक्यातील मौजे टाका येथील तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत अधिक माहिती की मराठा क्रांती मोर्चाच्या अंदोलनाला पाठिंबा देत काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली. त्यामुळे आपणही आत्मदहन करण्याचा निर्धार केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
आपल्या इशाऱ्याबद्दल अजित दयानंद शिंदे, महेश रामचंद्र शिंदे, राजकिरण माणिक साठे, चैतन्य अर्जुन गोरे, रवीकांत विलास पाटील, जगदिश चंद्रकांत शिंदे, विलास श्रीहरी शिंदे, सावंत शिवाजी शेषेराव यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात शासनास कळवले आहे. ३० तारखेपर्यंत या संदर्भात निर्णय जाहीर करण्यात यावा अन्यथा त्यांनतर आपण ३१ जुलै रोजी औसा येथील तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


























































