Aus VS Ind टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, 51 धावांनी ऑस्ट्रेलियाचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाने दिलेले 91 धावांचे लक्ष्य अवघ्या 21 षटकात पूर्ण करत टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवला. फलंदाज व गोलंदाज दोघांनीही खराब खेळ केल्याने टीम इंडियाचा पराभव झाला. पहिल्या ड़ावाच्या अखेर मजबुत स्थितीत दिसणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या डावाची सुरुवात होताच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पाणी पाजले.

ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात 191 धावांत गुंडाळल्यानंतर हिंदुस्थानी संघ बराच आनंदीत झाला होता.  मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाचा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या डावात हिंदुस्थानी संघाच्या धावफलकावर अवघ्या 31 धावा लागलेल्या असताना 9 फलंदाज पॅव्हेलिअनमध्ये परतले होते. 36 धावा होईपर्यंत हिंदुस्थानी संघाचा डाव आटोपला होता.

संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना भोपळाही फोडता आला नाही. जे 9 फलंदाज बाद झाले, त्यातल्या एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ हा शुक्रवारीच बाद झाला होता. शनिवारी मयांक अग्रवाल आणि नाईट वॉचमन जसप्रीत बुमराह यांना जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्सने झटपट बाद केलं.

त्यानंतर आलेला पुजारा शून्यावर बाद झाला तर विराट कोहली हा 4 धावांवर बाद झाला. कोहलीपूर्वी अजिंक्य रहाणे हा शून्यावर बाद होऊन तंबूत परतला होता. वृद्धीमान साहा 4 धावा काढून तर रविचंद्रन अश्विन हा शून्यावर बाद झाला. हनुमा विहारी हा देखील एकेरी धावसंख्येवर बाद झाला असून त्याला 8 धावाच करता आल्या.

मोहम्मद शमी फलंदाजी करत असताना जायबंदी झाल्याने हिंदुस्थानी संघाचा डाव 36 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला असून त्याने 5 बळी टिपले. मिचेल स्टार्कने त्याला उत्तम साथ देत 4 बळी टिपले आहेत.