क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते, ‘चॅनेल सेव्हन’चा आरोप

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मैदानात क्रिकेटवॉर सुरू आहे. पण या दोन देशांच्या मालिकेवरून मैदानाबाहेरही एक लढाई सुरू आहे. या मालिकेतील लढतींचे प्रक्षेपण करणारी वाहिनी अर्थातच ‘चॅनेल सेव्हन’ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. बीसीसीआयसमोर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते, असा आरोप करीत ‘चॅनेल सेव्हन’ने न्यायालयात धाव घेतली आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेने या मालिकेची सुरुवात होणार होती, पण बीसीसीआयच्या सोयीनुसार दौऱयाचा कार्यक्रम बदलण्यात आला. त्यामुळे कसोटीऐवजी वन डे व टी-20 मालिका आधी खेळवण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या