स्फोटक फलंदाज डेव्हीड वॉर्नरनेही म्हटले ‘जय श्री राम’

ऑस्ट्रेलियाचा (Australia) स्फोटक फलंदाज डेव्हीड वॉर्नर (David Warner) हा हिंदुस्थानी संस्कृती आणि खासकरून इथल्या चित्रपटसृष्टीच्या आकंठ प्रेमात बुडालेला क्रिकेटपटू आहे. संपूर्ण हिंदुस्थान 22 जानेवारी रोजी राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या (Ayodhya Ram Temple) प्राण प्रतिष्ठा (Consecration Ceremony)  सोहळ्याच्या आनंदात न्हाऊन निघाला होता. डेव्हीड वॉर्नर यालाही या दिवसाचा आनंद साजरा करण्याचा मोह आवरला नाही. या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी न मिळालेल्या इन्स्टाग्राम आधार घेत ‘जय श्री राम’ चा जयघोष केला आहे. श्री रामाचे एआयच्या मदतीने तयार केलेले चित्र पोस्ट करत वॉर्नरने हा जयघोष केला असून त्याच्या पोस्टवर शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

वॉर्नरच्या या कृतीने त्याचे चाहते खूश झाले आहेत. वॉर्नरच्या या पोस्टवर त्यांनी जय श्री राम म्हणत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलंय की तू जन्माने जरी ऑस्ट्रेलियन असलास तरी मनाने सच्चा हिंदुस्थानी आहेस.

कालचक्र बदलेल, मोदी झाले भावुक

आज गावागावांत कीर्तन, भजन होत आहेत. अवघा देश दिवाळी साजरी करतोय. सायंकाळी घराघरांत रामज्योत तेवेल. काल मी धनुषकोडीत होतो. ज्या वेळी राम समुद्रापार निघाले होते तेव्हा कालचक्र बदलले. आजपासून पुन्हा कालचक्र बदलेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठापना सोहळय़ानंतर उपस्थितांना संबोधित करताना भावुक झाले. रामलल्ला आता तंबूत नाही, तर दिव्य मंदिरात राहणार, असे ते म्हणाले. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, सर्वांना प्रणाम आणि राम राम… आज आपले राम आले आहेत, अशी भावनिक साद घालत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

राम मंदिर उभे राहिल्यानंतर देशभरात नवा उत्साह आणि चैतन्य आले. आज आपल्याला शतकांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर मिळाले आहे. 22 जानेवारी 2024 चा सूर्य एक अद्भुत तेज घेऊन आला आहे. ही कॅलेंडरमध्ये लिहिलेली तारीख नाही, तर नव्या युगाचा आरंभ आहे. पुढची हजारो वर्षे या क्षणाची आठवण काढली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. मंदिर उभे राहण्यासाठी वेळ लागला त्याबद्दल मोदी यांनी प्रभू श्रीरामाची क्षमाही मागितली. त्याग, तपस्या आणि पूजेत काहीतरी उणीव राहिली होती त्यामुळेच मंदिर निर्माण होऊ शकले नाही. आज ही उणीव भरून निघाली. प्रभू श्रीराम आपल्याला क्षमा करतील असा मला विश्वास आहे. अनेक दशके प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वाची कायदेशीर लढाई लढली गेली. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

शतकांचा वारसा मिळाला

राम मंदिराच्या उभारणीनंतर देशवासीयांमध्ये नवा उत्साह असून आज आपल्याला शतकानुशतकांचा वारसा मिळाला आहे. श्रीरामाचे मंदिर मिळाले आहे. आपल्या अनेक पिढय़ांनी जे धैर्य दाखवले त्या धैर्याचा वारसा आपल्याला मिळाला आहे. गुलामगिरीची मानसिकता मोडून उठणारे राष्ट्र नवा इतिहास घडवते. आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या क्षणाबद्दल बोलतील, ही रामाचीच कृपा आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.