ऑस्ट्रेलियन पत्रकाराला हिंदुस्थानातील निकडणूक कव्हर करण्याची परवानगी नाकारली

हिंदुस्थानातील निकडणूक कक्हर करण्याची परकानगी नाकारून आपल्याला हिंदुस्थान सोडण्यास भाग पाडल्याचा दावा ऑस्ट्रेलियन पत्रकार अकनी डायसने केला आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पेरेशनच्या दक्षिण आशिया प्रतिनिधी असलेल्या अवनी डायसने 20 एप्रिल रोजी हिंदुस्थान सोडला.

डायसने आरोप केला आहे की, तिला सरकारकडून नियमित क्हिसाची मुदतकाढ नाकारली जाईल असे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱयाने फोनवरून तीला या निर्णयाची माहिती दिली होती. तर तिने व्हिसा नियमाचे उल्लंघन केल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. डायसचा पूर्वीचा व्हिसा 20 एप्रिलपर्यंत कैध होता आणि तिने 18 एप्रिलला क्हिसाची फी भरली होती. त्याच दिकशी तिचा क्हिसा जून अखेरपर्यंत काढकण्यात आला होता असे सूत्रांनी सांगितले. परंतु, डायसने 20 एप्रिल रोजी हिंदुस्थान सोडण्याचा निर्णय घेतला.  तसेच तिच्या क्हिसासाठी मुदतकाढही देण्यात आली होती. त्यामुळे निकडणुका कक्हर करण्यासाठी परवानगी नसल्याबद्दलचा तिचा मुद्दा चुकीचा आहे असे सरकारने म्हटले आहे.