बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पानिपत’ या चित्रपटासाठी आपल्या कादंबरीतील घटना आणि तपशील परवानगी न घेताच वापरण्यात आल्याचा आरोप ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी केला आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

विश्वास पाटील यांनी ‘पानिपत’ कादंबरी लिहिली असून या कादंबरीवरून सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे, मात्र कादंबरीतील तपशील वापरण्याबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, असा आरोप करत पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.