Aprilia ने हिंदुस्थानात लॉन्च केले आपले BS6 दुचाकी मॉडेल; कोणत्या मॉडेलची किती किंमत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Aprilia ने हिंदुस्थानात आपले BS6 मॉडेल लॉन्च केले आहेत. या मॉडेलमध्ये Aprilia स्कूटरचे SR 160, SR 125 आणि Storm 125 चा समावेश आहे. हे सर्व मॉडेल हिंदुस्थानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नवीन मॉडलसह यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. याच्या सर्व मॉडेलच्या किंमतीत 19,000 रुपयांची वाढ झालेली दिसत आहे. चला तर जाणून घेऊन कोणत्या मॉडेलची किती आहे किंमत..

Aprilia SR 160 Race ची किंमत आता 1,13,671 रुपये झाली आहे. मात्र याच्या BS4 व्हेरियंटची किंमत 94,305 रुपये आहे. याच्या किंमतीत 19,336 रुपये इतकी वाढली आहे. Aprilia SR 160 Carbon किंमत 1,07,570 रुपये आहे. तर याच्या BS4 व्हेरियंटची किंमत 88,129 रुपये आहे. या स्कूटरच्या किंमतीतही 19,441 रुपयांची वाढ झाली आहे. Aprilia SR 160 ची किंमत 1,04,476 रुपये आहे आणि याच्या BS4 मॉडेलची किंमत 85,059 रुपये आहे. याच्या किंमतीतही 19,417 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच Aprilia SR 125 च्या किंमतीत 18,490 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याची किंमत आता 92,181 रुपये इतकी आहे. Aprilia Storm 125 च्या किंमतीतही 18,696 रुपयांची वाढ झाली असून याची किंमत आता 86,638 रुपये इतकी आहे.

160 स्कूटर बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात 160 cc चे सिंगल-सिलेंडर, 3 वाल्व इंजिन दिले आहे. जे 7,600 rpm वर 10.7 bhp पॉवर आणि 6,000 rpm वर 11.6 Nm टॉर्क जनरेट करते. 125 cc स्कूटर मध्ये 125 cc चे सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 7,250 rpm वर 9.4 bhp पॉवर आणि 6,250 rpm वर 9.9 Nm टॉर्क जनरेट करते.