‘या’ आहेत हिंदुस्थानातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, नियमित वापरासाठी आहेत बेस्ट…

हिंदुस्थानी बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असला आणि तुमचा बजट कमी असेल, तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला हिंदुस्थानी बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल माहिती सांगणार आहोत. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या खिशासोबतच पर्यावरणासाठी ही फायदेशीर ठरणार आहेत. चला तर जाणून घेऊ या इलेक्ट्रिक स्कूटर बदल.

Hero Flash LA

Hero Flash LA मध्ये बीएलडीसी हब मोटर बसवण्यात आली आहे. ज्याची क्षमता 250 डब्ल्यू इतकी आहे. या मोटरला पॉवर देण्यासाठी, 48 व्ही आणि 28 एएच क्षमतेच्या बॅटरी देण्यात आली आहे. या स्कूटरचे एकूण वजन 87 किलो आहे. संपूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर 50 किमी पर्यंत धावू शकते. यात डिजिटल स्पीडोमीटर, टेलीस्कोपिक सस्पेंशन, मॅग अ‍ॅलोय व्हील्स आणि एलईडी हेडलॅम्प्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत

कंपनीने याची किंमत 42,640 रुपये इतकी ठेवली आहे.

Ampere Reo Elite

Ampere Reo Elite 250 वॅटची मोटर देण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये लीड एसिड बॅटरी बसवण्यात आली आहे. यामुळे ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 55-65 किमी धावू शकते. या स्कूटरचे एकूण वजन 86 किलो आहे आणि कंपनी याच्या पुढील आणि मागील टायर्सवर 110 मि.मी. ड्रम ब्रेक बसवले आहेत. यात एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि यूएसबी चार्जिंग पॉईंट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत

कंपनीने याची किंमत 40,699 रुपये इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या