Maruti Suzuki Eeco चे 40,453 युनिट्स कंपनीने केल्या रिकॉल; जाणून घ्या काय आहे कारण..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहन उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने आपल्या Eeco मॉडेलचे 40,453 युनिट्स बाजारातून माघारी मागवले आहेत. असे बोलले जात आहे की, Maruti Suzuki Eeco च्या हेडलॅम्पवर मिसिंग सॅन्डर्ड सिम्बॉलमुळे असं करण्यात आलं आहे. यामध्ये कंपनी 4 नोव्हेंबर 2019 ते 25 फेब्रुवारी 2020 दरम्यान तयार झालेले इको वाहन पुन्हा रिकॉल करणार आहे.

हे रिकॉल पूर्णपणे ग्राहकांवर अवलंबून असेल. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून त्यांना या रिकॉलची आवश्यकता आहे की नाही? हे जाणून घेऊ शकतात. दरम्यान, हिंदुस्थानात इको ही प्रसिद्ध कार असून याची किंमतही कमी आहे.

इंजिन

Maruti Suzuki Eeco मध्ये कंपनीने 1.2 बीएस 6 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 73 bhp वर पॉवर आणि 101 Nm टॉर्क जनरेट करते.

मायलेज

पेट्रोल व्हर्जनसाठी या कारचे मायलेज 16.11 किमी / ली आहे, तर सीएनजी व्हर्जनमध्ये ही कार 20.88 किमी / किलोचे मायलेज देऊ शकते.

किंमत

Maruti Suzuki Eeco प्रारंभिक किंमत 3.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.