दसऱ्याचा मुहूर्त साधताय? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे…

2553

हिंदुस्थानात सध्या सणासुदीचा उत्साह सुरू आहे. आपल्या देशात सणासुदीचे मुहूर्त साधून अनेक लोक नवीन वस्तूची खरेदी करतात. याच काळात अनेक कार उत्पादक कंपन्या आपल्या नवीन कार लॉन्च करतात. हाच मुहूर्त साधत प्रसिद्ध कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने आली नवीन एसयूव्ही कार S-Presso हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. या कारच्या लॉन्चची घोषणा झाल्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक या कारच्या प्रतीक्षेत होते. अखेर ग्राहकांची ही प्रतीक्षा संपली आहे. या कारमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले असून याचा लूक पाहताच क्षणी तुम्हाला आवडेल असा आहे. ही कार सॉलिड सिझल ऑरेंज, पर्ल स्टरी ब्लू, सुपर व्हाइट, सॉलिड फायर रेड, मेटलिक ग्रॅनाइट ग्रे, मेटलिक सिल्की सिल्व्हर अशा 6 रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.आज आम्ही तुम्हाला या कारच्या फीचर्स आणि किंमत बद्दल संगर आहोत.

इंजिन आणि पॉवर

Maruti Suzuki S Presso मध्ये 998 सीसीचे BS VI इंजिन देण्यात आले आहे. जे 5500Rpm वर 50kw ची पॉवर आणि 3500Rpm वर 90Nm टॉर्क जनरेट करतो. तसेच ट्रान्समिशनसाठी या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आणि एजीएस आहेत.

435779-maruti-s-presso2

मायलेज

Maruti Suzuki S Presso चे  VXi MT, VXi MT,  VXi AGS आणि  VXi+ AGS व्हेरियंट प्रति लिटर  21.7 चा मायलेज देणार असा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये 27 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे.

maruti-suzuki-s-presso-1569812812

किंमत

याची एक्स शोरूम किंमत 3.50 लाख रुपयांपासून सुरु होऊन  5.50 लाख रुपयांपर्यंत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या