
ऑस्ट्रेलियाची वाहन उत्पादक कंपनी KTM ने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन KTM Duke 125 चा सर्वात स्वस्त मॉडेल लॉंन्च केला आहे. या बाईकची बुकिंग कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर सुरू झाली आहे. 2021 KTM Duke चा नवीन मॉडेल 250 ड्यूक आणि 390 ड्यूकशी मिळताजुळता आहे.
इंजिन आणि पॉवर
नवीन KTM Duke 125 मध्ये 124cc चे लिक्विड कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात येणार आहे. जे 9,250rpm वर 14.5bhp पॉवर आणि 8,000rpm वर 12Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन सिक्स-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. या बाईकची इंधन टाकीची क्षमता 10.5 लीटरवरून 13.5 लीटर करण्यात आली आहे, जी केटीएम 200 ड्यूक प्रमाणेच आहे.
ही एंट्री लेव्हल बाईक ऑरेंज-ब्लॅक आणि व्हाइट- ब्लॅक पेंटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. नवीन KTM Duke 125 मध्ये नवीन हेडलॅम्प आणि नवीन एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. हे सर्वे फीचर्स केटीएम ड्यूक 200 बाईकमधून घेण्यात आले आहेत.
किंमत
KTM Duke 125 ची किंमत 1.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.



























































