या दिवाळीत खरेदी करा ‘या’ बेस्ट electric scooter, एका चार्जमध्ये गाठणार 236 km 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या सणासुदीचे वातावरण आहे. अशातच अनेक लोक या दिवसाळीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. आज आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या काही बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल माहिती सांगणार आहोत.

Simple One

Simple One ही इलेक्ट्रिक स्कूटर अलीकडेच लॉन्च झाली आहे. यात 4.8kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी Ola इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये देण्यात आलेल्या बॅटरीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 236 किमीपर्यंत धावू शकते.

किंमत

या स्कूटरची किंमत 1.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Ola S1

Ola S1 मध्ये 3.9 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. जी 11 बीएचपी इलेक्ट्रिक मोटरला पॉवर प्रदान करते. याची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तासांचा वेळ लागतो. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 121 किमीपर्यंत धावू शकते. यात नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर असे तीन रायडींग मोड देण्यात आले आहे.

किंमत

याची प्रारंभिक किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. वेगवेगळ्या राज्यात याची किंमत कमी-जास्त असू शकते.

Ather 450X

Ather 450X ही स्कूटर कंपनीने वर्षभर आधी लॉन्च केली होती. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 166 किमीचा पल्ला गाठू शकते. यात 2.61kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. याची टॉप स्पीड 80 किमी प्रतितास इतकी आहे.

किंमत

याची प्रारंभिक किंमत 1.32 लाख रुपये आहे.