Royal Enfield Classic 350 नवीन अवतारात होणार लॉन्च, मिळणार नवीन फीचर्स…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield लवकरच आपली Classic 350 बाईक नवीन अवतारात हिंदुस्थानात लॉन्च करणार आहे. नुकतेच टेस्टिंग दरम्यान या बाईकचे काही फोटो समोर आले होते. या फोटोत ही बाईक लॉन्चसाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसून येत आहे.

एका युट्युब चॅनलने नवीन Classic 350 चा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यात ही नवीन Classic 350 स्पष्टपणे दिसत आहे. या बाईकचा नवीन मॉडेल J1D प्लटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे. याच प्लटफॉर्मचा उपयोग कंपनीने अलीकडेच लॉन्च झालेल्या Meteor 350 साठीही केला होता. यात रेट्रो स्विच गेअरसह ट्रिपल नेव्हिगेशन सिस्टम देखील देण्यात आले आहे.

कंपनी या बाईकमध्ये 349 सीसीचे एअर कुल्ड इंजिनचा उपयोग करू शकते. हेच इंजिन Meteor 350 मध्येही देण्यात आले आहे. हे नवीन सिंगल सिलेंडर ऑइल इंजेक्टर SOHC इंजिन आवाज देखील कमी करते. याचे इंजिन 20.2 hp ची पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. याला 5 स्पीड गेअरबॉक्स आणि ड्युअल चॅनल अँटी लॉक सिस्टमसह लॉन्च सादर केले जाऊ शकते.

किंमत

कंपनी या बाईकची किंमत 1.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवू शकते. दरम्यान ही बाईक कधी लॉन्च होणार या बाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.