70 हजारपेक्षाही कमी किंमतीवर मिळते ‘रॉयल एनफील्ड’

3719

देशातील सर्वात जुनी दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्ड या बाईकचे चाहते जगभरात मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्हाला माहीत आहे का रॉयल एनफील्ड ही बाईक आधी डिझेल व्हॅरियंट मध्येही उपलब्ध होती. ज्याचे उत्पादन कंपनीने 2000 साली बंद केले होते. Taurus असे या बाईकचे नाव होते. त्यावेळी या बाईकला मायलेजचा किंग असे म्हटले जायचे. मात्र याच बाईकचे काही मॉडेल अजूनही ऑटोबाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला याचा बाईकची किंमत आणि फीचर्स बद्दल सांगणार आहोत.

1997  रॉयल एनफील्ड Taurus

07_10_2019-re-bullet-diesel_19647489

ही बाईक 1997 रॉयल एनफील्ड Taurus बाईक आहे. OLX या ऑनलाइन वस्तू विक्रीच्या अॅपवर दिलेल्या माहितीनुसार, ही बाईक हरयाणा येथील तोहाना येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही बाईक आतापर्यंत 54,000 चालली आहे. या बाईकची किंमत 54,000 रुपये इतकी आहे.

1980 रॉयल एनफील्ड बुलेट डिझेल 

1980-diesel-bullet

OLX च्या माहितीनुसार ही बाईक तामिळनाडू येथील पोलाची येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाईकच्या इंधन टाकीवर कोणताही लोगो नसून ही बाईक चांगल्या कंडिशन मध्ये आहे. या दुचाकीचे इंजिनही चांगल्या स्थितीत असल्याची माहिती या अॅपवर देण्यात आली आहे. या बाईकची किंमत 67,000 रुपये इतकी आहे.

1975 रॉयल एनफील्ड बुलेट डिझेल 

1975-bullet

ही बाईक OLX वर दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही बाईक ग्रीन रंगात कस्टमाईज करण्यात आली आहे. या बाईकची कंडिशन चांगली असून ही बाईक दिसायलाही आकर्षक आहे. या बाईकची किंमत 75,000 रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या