‘या’ आहेत हिंदुस्थानातील सर्वात ‘असुरक्षित कार’, NCAP मध्ये मिळाली सर्वात कमी रेटिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणतीही कार लॉन्च होण्यापूर्वी त्याची पूर्ण टेस्टिंग केली जाते. यातच कारच्या सुरक्षितेबाबतही चाचणी केली जाते. न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (NCAP) ही एक अशी संस्था आहे, जी नवीन कारची क्रॅश टेस्ट करून त्यांना रेटिंग देते. आता याच संस्थेने हिंदुस्थानात लॉन्च झलेल्या काही कारला क्रॅश टेस्टमध्ये सर्वात कमी रेटिंग दिली आहे. म्हणजेच या कार सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू शकतात. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या कार…

Maruti Celerio

Maruti Suzuki celerio ही एक प्रसिद्ध हॅचबॅक आहे. ग्लोबल NCAP ने Celerio च्या बेस व्हेरियंटची टेस्ट केली आहे. ज्याचे वजन 1019 किलो आहे. या कारमध्ये ABS किंवा EBD सारखे फीचर्स देण्यात आलेले नाही. 64 किमी प्रतितास वेगाने या वाहनाची टेस्ट करण्यात आली. अडल्ट सेफ्टी बाबतीत या कारला 0 स्टार मिळाले आहेत. तर चाईल्ड सेफ्टीमध्ये या कारला 1 स्टार मिळाला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 4.53 लाख ते 5.78 लाख रुपये आहे.

Hyundai Santro

कार उत्पादक कंपनी Hyundai ची Santro ही प्रसिद्ध हॅचबॅक कार आहे. 1099 किलो वजनाच्या या कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रायव्हर साइड एअरबॅग, SBR, ABS देण्यात आले आहेत. NCAP ने केलेल्या क्रॅश टेस्टिंगमध्ये या कारला अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 2 स्टार मिळाले आहेत.

Maruti Suzuki Eeco

EECO च्या नॉन-एअरबॅग व्हेरियंटची 2016 मध्ये क्रॅश टेस्ट घेण्यात आली होती. या कारचे वजन 1124 किलो आहे. क्रॅश टेस्टमध्ये कारच्या कोणत्याही प्रकारात कोणतीही सुरक्षा फीचर्स आढळून आली नाहीत. याला अडल्ट सेफ्टीत 0 स्टार आणि चाईल्ड सेफ्टी रेटिनमध्ये 2 स्टार मिळाले आहे.