कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर किती दिवस सेक्स करू नये? वाचा तज्ज्ञांचा सल्ला आणि कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिएंट जगभरात हाहाकार उडवत देत असून यावर लसीकरण हाच पर्याय असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. यासाठी विविध देशांनी कोरोना प्रतिबंधक लस तयार केली असून यावर अजून संशोधनही सुरू आहे. लसीकरणाचा वेग वाढवल्याने कोरोना आटोक्यात येईल असे तज्ज्ञ म्हणत आहेत. परंतु कोरोना लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असून लोकांच्या मनात शंका आहेत.

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत डब्ल्यूएचओनेही देखील माहिती दिली आहे. मात्र रशियातील डॉक्टरांनी दिलेल्या एका सल्ल्यामुळे वादविवाद रंगला आहे. डॉ. डेनिस ग्रेफर यांनी हा सल्ला दिला असून लस घेतल्यानंतर किती दिवसांनी शरीरसंबंध ठेवावे याबाबत सांगितले आहे.

डॉ. डेनिस ग्रेफर हे रशियातील सेराटोव प्रांताचे उपआरोग्यमंत्री आहेत. लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस संभोग करू नये असा सल्ला त्यांनी ‘लसवंत’ होणाऱ्या लोकांना दिला आहे. शरीरसंबंधादरम्यान शरीरात तणाव वाढतो. लस घेतल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलास हा तणाव अपायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉ. ग्रेफर म्हणाले की, शरीरसंबंधादरम्यान मोठ्या प्रमाणात शारीरिक ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अधिक ऊर्जा लागणाऱ्या सेक्ससारख्या कोणत्याही क्रिया करू नयेत. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिले आहे.

कोरोना लसीसाठी सेक्स वर्कर उतरल्या रस्त्यावर, प्राधान्याने लस देण्याची केली मागणी

वरिष्ठांची टिका

दरम्यान, डॉ. ग्रेफर यांचे वरिष्ठ ओलेग कोस्टीन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. लस घेतल्यानंतर सेक्स करण्यास हरकत नाही, मात्र थोडी काळजी घ्या. अतिरेक करू नका, लोकांना एवढी समज नक्की असेल, असे ओलेग कोस्टीन यांनी म्हटले.

सेक्स करतानाही सोशल डिस्टन्स पाळा, ऑस्ट्रेलिया सरकारची अजब नियमावली