अयोध्येत सुरक्षेसाठी 1,000 सीसीटीव्ही

अयोध्या महानगरपालिका स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत अयोध्या आणि फैजाबाद परिसरात सुमारे 1,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. अयोध्येतील सेवा आणि ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी एकात्मिक कमांड अॅण्ड पंट्रोल सेंटरही स्थापित केले जाणार आहे. एकूण 56 कोटी खर्चून सीसीटीव्ही बसवले जातील, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अयोध्या आणि परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.