Ayodhya Ram Mandir Inauguration – विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली ‘श्रीराम’ अक्षरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

अयोध्येतील राम जन्मभूमीवरील भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण व रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शाळा, महाविद्यालये, विविध प्रतिष्ठाने, संस्था संघटना सर्वांमध्येच श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळमधील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयातील 500 विद्यार्थ्यांनी ‘श्रीराम’ अक्षरे साकारली आहेत.

विद्यार्थिनींनी दिव्यांची प्रतिकृती तयार केली. भगव्या टोप्या घातलेल्या विद्यार्थ्यांनी दिव्यातील ज्योत साकारली होती. श्रीराम हे अक्षरे पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय’ व ‘पवनसुत हनुमान की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

ही अक्षरे साकारण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक विवेक अलोणी, चित्रकला शिक्षक प्रवीण जिरापुरे, क्रीडाशिक्षक प्रफुल्ल गावंडे, निलेश पत्तेवार, चंद्रकांत मडपाके, विवेक कवठेकर, वैशाली ठाकरे, जया दुधे, पूनम आत्राम, महेश कोकसे, हेरंब पुंड, प्रीती चौधरी, सोनाली पडलवार, संजय येवतकर, दिनेश गहरवार, आशिष दंडावार, दीपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अक्षरांचे राजेश शर्मा यांनी ड्रोनद्वारे चित्रीकरणदेखील केले.