बाबरी ढाचाखाली उत्खनन करण्याची शिवसेनाप्रमुखांनी केली होती मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत 1992 साली बाबरी ढाचा पाडल्यानंतर देशासह जगभर खळबळ उडाली. राजकीय चर्चेचे गुऱहाळ सुरू झाले. अशा वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी ढाचाखाली उत्खनन करा, तिथे राममंदिरच सापडेल अशी जाहीर भूमिका घेतली.

बाळासाहेबांची हीच भूमिका शिवसेनेने संसदेत जोरदारपणे मांडली. शिवसेनेच्या या भूमिकेचे भाजपच्या सर्व खासदारांनी समर्थन केले. आताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात याच उत्खननात सापडलेल्या पुराव्याच्या आधारावर अयोध्येतील जागा ही मशीद नसून राममंदिरच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा एक प्रकारे शिवसेनेच्या भूमिकेचा विजय आहे, अशी आठवण शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी सांगितली. दरम्यान, राम मंदिर व्हावे यासाठी शिवसेनेने संसदेत वेळोवेळी आवाज उठवला होता. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन राम मंदिर झालेच पाहिजे, अशी सिंहगर्जना केली होती असेही रावले म्हणाले.