बाईपण भारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3’ शोमध्ये शनिवारी ‘बचपन स्पेशल’ भाग रंगणार आहे. यावेळी ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या टीमची खास उपस्थिती असेल. तसेच ‘अकेली’ या हिंदी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री नुशरत भरुचा हीदेखील ‘बचपन स्पेशल’मध्ये सहभागी होईल. दिग्दर्शक केदार शिंदे आणि सोनाली बेंद्रे यावेळी ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटाच्या आठवणी जागवणार आहेत. याबद्दल केदार शिंदे म्हणाले, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोसंबंधित लोकांशी माझे भावनिक नाते आहे. माझा पहिला चित्रपट होता ‘अगं बाई अरेच्चा!’ ज्यामध्ये सोनाली, जी फराह खानने कोरिओग्राफ केलेल्या ‘छम छम करता’ या गाण्याचा भाग होती. आज त्या साऱया आठवणी जाग्या झाल्या आहेत.