लॉस एंजेलिसमध्ये झळकणार बाबा

634

ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निवड ‘गोल्डन ग्लेब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’साठी झाली आहे. चित्रपटाचे निर्माते ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक सुभेदार, आरती सुभेदार यांनी ही गूड न्यूज दिली आहे. ‘दीपक दोब्रीयाल, नंदिता पाटकर व बालकलाकार आर्यन मेंघजी यांनी चित्रपटात अभिनयाची कमाल केली आहे. राज गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली आहे. दीपक दोब्रीयाल म्हणाले की, ‘बाबा’ चित्रपटाची कथा पहिल्यांदा मला ऐककली गेली तेक्हापासून तो माझ्यासाठी अत्यंत महत्त्काचा चित्रपट आहे. अशाप्रकारच्या चित्रपटामध्ये काम करणे हे कोणत्याही कलाकारासाठी एक मोठी गोष्ट असते आणि या चित्रपटातील माधवची भूमिका करण्याची संधी मला मिळाली याचा मला मनस्वी आनंद आहे. 5 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या ‘गोल्डन ग्लोब्ज’ मध्ये ‘बाबा’ चित्रपट दाखवण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या