
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापकAPOLOGISE बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात शनिवारी बिनशर्त माफीनामा सादर केला. न्यायालयाला दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन करून दिशाभूल करणाऱया वैद्यकीय जाहिरातींच्या प्रकाशनामुळे त्यांच्याविरुद्ध अवमानाचा खटला सुरू आहे. पतंजलीच्या जाहिरातींच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेतून हे अवमान प्रकरण उद्भवले आहे.

























































