… म्हणून गांधी कुटुंबाचे राजकारण बिघडले, बाबा रामदेव यांचा टोला

baba-ramdev

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्वजनिकरित्या योग करतात. माजी पंतप्रधान जवाहर लाल नेहरू आणि इंदिरा गांधी लपून-छपून का होईना योग करत होते. परंतु त्यांच्या भावी पिढीने योग न केल्याने त्यांचे राजकारण बिघडले. योग केल्याने चांगले दिवस येतात’, असे योग गुरू बाबा रामदेव म्हणाले. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. बाबा रामदेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नांदेडमध्ये योग दिवस साजरा करणार आहे. त्यापूर्वी बाबा रामदेव यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने खराब प्रदर्शन केले होते. त्यावेळी काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. 2019 मध्येही काँग्रेसचा सफाया झाला आणि त्यांना फक्त 52 जागा जिंकता आल्या. याच खराब प्रदर्शनावरून योगगुरू बाबा रामदेव काँग्रेसवर निशाणा साधत आले आहेत.