बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी आकाशदीप सिंगला जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी आकाशदीप सिंग याला हायकोर्टाने आज जामीन मंजूर केला. आकाशदीप सिंग हा पंजाबमधील रहिवासी असून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी जामीन मंजूर झालेला पहिला आरोपी आहे.

बाबा सिद्दिकी यांची 12 ऑकटोबर 2024 च्या रात्री वांद्रे येथे तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी आतापर्यंत 27 हून अधिक आरोपींना ताब्यात घेतले आहे. सिंगने गोळीबार करणारे आणि बिष्णोई टोळीशी संबंधित कट रचणाऱयांमध्ये समन्वयक म्हणून काम केले. आकाशदीप याने जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी-शर्ती लादल्या.