
बाबरी मशीद पतन प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ही घटना पूर्वनियोजित नव्हती असे लखनौ येथील विशेष सीबीआय न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे न्यायालयाने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, साध्वी ऋतंभरा, मुरली मनोहर जोशीसह 32 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.ज्या नेत्यांवर आरोप ठेवण्यात आला होता, त्या नेत्यांनी कारसेवकांना रोखण्यासाठी प्रयत्न केला होता. या नेत्यांनी बाबरीचा विध्वंस टळावा यासाठी आवाहनही केलं होतं, मात्र जमाव संतापलेला होता आणि त्यांनी बाबरी पाडली असं न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
लखनऊ की विशेष अदालत द्वारा बाबरी मस्जिद विध्वंस केस में श्री लालकृष्ण आडवाणी, श्री कल्याण सिंह, डा. मुरली मनोहर जोशी, उमाजी समेत ३२ लोगों के किसी भी षड्यंत्र में शामिल न होने के निर्णय का मैं स्वागत करता हूँ। इस निर्णय से यह साबित हुआ है कि देर से ही सही मगर न्याय की जीत हुई है।
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 30, 2020
Babri Masjid demolition case: Court says no conclusive proof against accused
— Press Trust of India (@PTI_News) September 30, 2020
Special CBI Court observed that the 1992 Babri Masjid demolition was not pre-planned. https://t.co/dwpyHkDM6X
— ANI (@ANI) September 30, 2020
अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त प्रकरणाचा निकाल बुधवारी म्हणजेच 30 सप्टेंबरला लखनौ येथील सीबीआय विशेष न्यायालयाने दिला. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली होती. याप्रकरणी 32 जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. ज्यांच्यावर आरोपपत्र आहे त्या 32 जणांनी निकालावेळी न्यायालयात हजर रहावे, असे आदेश यापूर्वी दिले होते. या खटल्यात 351 प्रत्यक्षदर्शीची साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली असून. सहाशे पानी कागदपत्रे सीबीआयने न्यायालयात सादर केली होती. लखनौतील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. यादव यांनी बुधवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर केला.
वय आणि प्रकृत्तीच्या कारणामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासह कल्याणसिंह, नृत्यगोपाल दास निकालावेळी हजर राहण्याची शक्यता कमी होती आणि झालेही तसेच. भाजप नेत्या उमा भारती यांना कोरोना संसर्ग झाल्याने त्या न्यायालयात हजर राहू शकल्या नाहीत.



























































